Nandurbar Accident : झापी घाटात भीषण अपघात; प्रवासी असलेली गाडी १०० फूट खोल दरीत कोसळली

Nandurbar News : डोंगर भागात असलेले कच्चे रस्ते खराब झाले आहेत. यावरून वाहने चालविणे वाहन चालकांना जिकरीचे जात आहे. यात घाट रस्त्यातून गाड्या चालविताना मोठी कसरत वाहन धारकांना करावी लागत आहे
Nandurbar Accident
Nandurbar AccidentSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरात असलेल्या झोपी घाटातून जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. वळण रस्त्यावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात आज दुपारच्या सुमारास घडला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरात असलेल्या झापी गावाचा घाटात हा अपघात दुपारी घडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. यामुळे डोंगर भागात असलेले कच्चे रस्ते खराब झाले आहेत. यावरून वाहने चालविणे वाहन चालकांना जिकरीचे जात आहे. यात घाट रस्त्यातून गाड्या चालविताना मोठी कसरत वाहन धारकांना करावी लागत आहे. 

Nandurbar Accident
Shirdi Sai Baba : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; साई संस्थानकडून नविन डोनेशन पॉलिसी, या भक्तांनाही मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात 

दोन दिवसांपूर्वी घाट रस्त्यातून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. यानंतर झापी गावच्या घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झालेला आहे. घाटावरील तीव्र उतार आणि वळण रस्ता असल्याने याठिकाणी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. घाट रस्ता असताना रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे नसल्याने वाहने घाटामधून तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळले आहे.

Nandurbar Accident
Lightning Strike : जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज कोसळली; महिलेचा मृत्यू, शेतमजूर जखमी

गाडीतील पाच जण जखमी  

सदर अपघातात वाहनात बसलेले ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील नागरिकांनी धाव घेत गाडीतील जखमींना बाहेर काढले. दरम्यान भरधाव वाहन १०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे वाहनाचा चुराडा झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com