Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : लग्नाचे आमिष देत ३० महिलांची फसवणूक; मुंब्रा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Thane News : जीवनसाथी डॉट कॉम या साईडवर बनावट आयडी तयार करून महिलांशी संपर्क साधला. महिलांना लग्नाचे आमिष दाखवत जवळपास ३० महिलांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले

विकास काटे, ठाणे

नवी मुंबई : लग्नासाठी मुलगा व मुलीचा शोध घेण्यासाठी काही साईड आहेत. यावर नोंदणी करून पसंती केली जाते. अशाच जीवनसाथी डॉट कॉम या साईडवर बनावट आयडी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. महिलांना लग्नाचे आमिष देत साधारण एक कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुंब्रा पोलिसांनी जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी जीवनसाथी डॉट कॉम या साईडवर बनावट आयडी तयार करून महिलांशी संपर्क साधला. महिलांना लग्नाचे आमिष दाखवत जवळपास ३० महिलांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यातील जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलूनचे दुकान आहे. तर दुसरा फहाद हा उत्तर प्रदेशमधील फिल्म प्रोड्युसर असून त्याचे स्वतःचे कॉल सेंटर आहे. 

वेगवेगळे कारण सांगून पैसे उकळले 

कॉल सेंटरच्या मदतीने या दोघांनी मिळून गरजू महिलांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला. त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहेत. अपघात झाला आहे, असे विविध कारण सांगून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी मुंब्रा येथील एका महिलेला देखील अशाच प्रकारे १३ लाख ५४ हजारांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मुंब्रा ठाण्यात धाव घेत भामट्यांविरोधत गुन्हा दाखल केला. 

कॉल सेंटर उध्वस्त करत रक्कम हस्तगत 

ऑनलाईन फ्रोडचे प्रमाण वाढले असून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सरवडे आणि पोलीस उप निरीक्षक विजय सानप यांची दोन पथके तैनात केली. या पथकांनी कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणा आणि ऑनलाईन माहिती मिळवत दोघांना जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी फहाद याचे उत्तर प्रदेशातील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून तेथून ९ लॅपटॉप, राउटर, मोबाईल सिमकार्ड व इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच फिर्यादी महिलेचे ऑनलाईन लुटलेले १३ लाख ५४ हजार रुपये ही परत मिळवले. आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT