अजय सोनवणे
मालेगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे बाजार समितीमध्ये सत्ता पालट होऊन शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. यात चंद्रकांत शेवाळे यांची सभापती पदावर तर अरुणा सोनजकर यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
मालेगाव बाजार समितीवर ठाकरे गट शिवसेनेची सत्ता होती. यात ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचे संचालक पद रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे १० संचालक हे मंत्री दादा भुसे यांच्या गटात सहभागी झाले होते. अद्वय हिरे यांच्या राजीनाम्यानंतर मालेगाव बाजार समितीत सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणूक लावण्यात आली होती. त्यानुसार आज सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडली.
एकाच गाडीत पोहचले संचालक
हिरे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाचे संचालक हे मंत्री दादा भुसे यांच्या गटात सामील झाले होते. तर गेल्या काही दिवसांपासून सर्व संचालक हे अज्ञात ठिकाणी होते. आजच्या निवडणुकीत सर्व संचालक अचानक एकाच गाडीत बाजार समितीत पोहचले होते. यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरवात करण्यात आली होती. या निवडणुकीत दादा भुसे यांच्या गटात १४ संचालक होते.
सभापती- उपसभापतींची बिनविरोध निवड
दरम्यान आज झालेल्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अद्वय हिरे गटाचे संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे मंत्री दादा भुसे गटाची सरशी मंत्री भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे यांची सभापतीपती तर अरुणा सोनजकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यामुळे अद्वय हिरे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. निवड झाल्यानंतर यावेळी भुसे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. यावेळी मंत्री भुसे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.