ठाणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवायचा; हे प्रत्येक भारतीयांच्या मनात होतं. जात, धर्म आणि प्रांत याच्या वरती जाऊन प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं कि २६ जणांचे प्राण घेतले गेले; त्याचा बदला घेतला पाहिजे. भारतीयांच्या मनात असलेले आज प्रत्यक्षात भारतीय सैन्य दलाने करून दाखविले आहे. पाकिस्तानची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे; अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ऑपरेशन सिंदूरवर दिली आहे.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानवर आज रात्री एअर स्ट्राइक करत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्डे उडवून दिले. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कामगिरीत पक्ष असूच नये
आमदार आव्हाड म्हणाले, कि सेनेने जे काही केले त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. प्रत्येक भारतीयाची छाती आज अभिमानाने फुलू लागली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीमध्ये पक्ष असूच नये; आम्ही सर्वच याबद्दल अभिमान बाळगत आहोत.
ये तो झांकी है..
तसेच रात्री राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय सैन्याचे अभिनंदन करत असताना पाकिस्तानने जेव्हा जेव्हा वाकोल्या दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा तेव्हा त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे, ही प्रत्येक भारतीच्या मनातली इच्छा आहे. ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है..अशा शब्दात आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.