Ashram School Saam tv
महाराष्ट्र

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

Thane Murbad News : १२ कोटी रुपये खर्च करून शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. तर १५ ऑगस्टपूर्वी शाळा नवीन इमारतीत हलवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे पूर्ण झाली नाहीत

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मढ येथील शासकीय आश्रम शाळा गेल्या वर्षभरापासून पोल्ट्री शेडमध्ये भरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान शाळेची सुसज्ज अशी नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असताना देखील शाळा स्थलांतरित करण्यात आलेली नाही. यामुळे आता शाळा नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. 

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा दिनांक ९ ते १२ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत ठाणे जिल्ह्याचा दौरा आयोजित केला या पार्श्वभूमीवर नारायण सावळा यांनी समिती प्रमुख तथा आमदार दौलत दरोडा यांची जिल्हाअधिकारी कार्यालय ठाणे येथे भेट घेऊन मुरबाड तालुक्यातील मढ शासकीय आश्रम शाळा तात्काळ नवीन इमारतीत स्थलांतरित करावी; अशा मागणीचे पत्र सादर केले. यावेळी समिती प्रमुख आणि समितीच्या सदस्यांशी चर्चा केली असता सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मढ येथील आश्रम शाळेसाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. १९ सप्टेंबर २०२४ रोजी शाळेच्या नव्या इमारतीचे हस्तांतरण प्रमाणपत्र (ताबा पावती) मिळाल्यानंतरही आजतागायत शाळा नवीन इमारतीत स्थलांतरित झालेली नाही. तर शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून १५ ऑगस्टपूर्वी शाळा नवीन इमारतीत हलवण्याचे तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुहूर्त ठरवून शाळा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, ही दोन्ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत.

आदिवासी विकास आयुक्तालयाकडे तक्रार 

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर तसेच तुकाराम रडे, बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटना यांनी आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांच्याकडे मेलद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोल्ट्री शेडमध्ये वर्ग भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शाळेची नवीन इमारत तयार असूनही लाखो रुपये भाडे देऊन पोल्ट्री शेडमध्ये शाळा भरविली जात नाही. वारंवार अर्ज दिले गेले तरी केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात कोणतीही कृती होत नाही. तक्रारीत जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, शाळेचे त्वरित नवीन इमारतीत स्थलांतर करावे, पोल्ट्री शेडसाठी दिलेले भाडे संबंधितांकडून वसूल करावे आणि या संदर्भातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

Sachin Pilgaonkar: 'मी उर्दूसोबत झोपतो, रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच...; सचिन पिळगांवकरांचे पुन्हा एक वकव्य चर्चेत

Retirement Planning: EPF, NPS की PPF; कोणत्या योजनेत मिळणार सर्वाधिक परतावा? कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT