Thane Municipal Corporation Announces Diwali Bonus saam tv
महाराष्ट्र

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी बोनस ; टीएमटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ

Thane Municipal Corporation Diwali bonus : ठाणे महानगरपालिका आणि टीएमटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करत प्रशासनाने प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बोनस जाहीर केले आहे. हा पैसा दिवाळीपूर्वीच थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Saam Tv

ठाणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता प्रत्येकी २५ हजार रुपये बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २४ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आले होते. यंदा त्यामध्ये वाढ करून थेट २५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही बोनसची रक्कम दिवाळीपूर्वीच संबंधित सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

कोणाला होणार फायदा?

या कल्याणकारी निर्णयाचा लाभ ठाणे महानगरपालिकेचे ६ हजार २९४ नियमित कर्मचारी, परिवहन सेवेचे १ हजार २८५ कायम कर्मचारी तसेच महापालिकेतील थेट कंत्राटी व इतर ३६८ अशा एकूण हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस दिल्याने ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सुमारे २० कोटी ११ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या सणासुदीच्या आनंदात भर घालण्यासाठी महापालिकेने हा खर्च उचलला आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या वतीने दिवाळीनिमित्त नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याची परंपरा कायम राखण्यात आली आहे. यंदा बोनसच्या रकमेत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, वेळेवर पैसे खात्यात जमा होणार असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; कार्यालयात धमकीचं पत्र

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडला विजयाचा सूर सापडला, पण भारताने या ५ चुका केल्या नसत्या तर...

काहीतरी मोठं घडणार? 12 देशांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, घरात अन्न-धान्य आणि औषध साठवण्याच्या सूचना; जगात खळबळ

Tukaram Mundhe : ५ FDA अधिकार्‍यांना सस्पेंड केलं, २१ अधिकारी रडारावर, तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई

HSRP नंबर प्लेट बसवण्यात दिरंगाई; राज्यातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT