बदलापूर : कालपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने (Rain) जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बारवी धरणक्षेत्रात (Barvi Dam) मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे ठाणे (Thane) जिल्ह्यावरील संभाव्य पाणीकपातीचं संकट अखेर टळलं आहे. त्यामुळे ठाणेकरांची पाणीचिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. (Thane barvi dam news In Marathi )
बदलापूरच्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संपूर्ण जून महिन्यात पावसानं पाठ फिरवली होती. जून महिना संपूनही धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्यानं ठाणे जिल्ह्यात पाणीकपात केली जाण्याची शक्यता होती. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात जून महिन्याअखेर फक्त ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता.
त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही आठवड्याला साधारण २० ते २५ टक्के पाणीकपात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. विशेषतः बारवी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस असून त्यामुळं ठाणे जिल्ह्यावरील संभाव्य पाणीकपात टळणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्हातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या ३ वर्षात बारवी धरण पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो होण्याची तारीख पुढे पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. २०१९ साली ४ ऑगस्ट रोजी भरलेलं हे धरण २०२० साली ३० ऑगस्ट रोजी, तर २०२१ साली ९ सप्टेंबर रोजी भरलं होतं. त्यामुळं यंदा जुलै महिन्यात पावसाचा जोर कितपत राहतो, आणि धरण कधी भरतं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.