Pune municipal election seat sharing update : पुणे महापालिका निवडणुकीबाबत शनिवारच्या घडामोडी पाहता तिरंगी लढतीची शक्यता वाढली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप जाहीर झाले नसले तरी तिन्ही पक्षांना प्रत्येकी 50 जागा मिळणार असल्याचे दिसते. महायुतीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचे रडगाणे अद्याप सुटले नसून त्याबाबत आज मुंबईत निर्णय होईल असे सांगण्यात आले. मात्र शिवसेना शिंदे गटातील वादाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा सोडून खासगी गाडीत गेल्याची चर्चा शनिवारी अधिक रंगली. भाजप-शिंदेसेना, मविआ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, अशी तिरंगी लढत पुण्यात होऊ शकते. त्याशिवाय, भाजप, शिंदे-पवार आणि मविआ (शरद पवार, उद्धव ठाकरे,काँग्रेस) अशी लढतही होऊ शकते.
भाजपची पहिली यादी आज, १०० नावांवर शिक्कामोर्तब -
पुणे महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील २६ तारखेचा यादीचा मुहूर्त हुकल्याने आता आता दुसरा मुहूर्त तरी होणार का याकडे लक्ष लागलेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत सुमारे १०० नावांवर पूर्णपणे तोडगा काढला आहे. आज भाजप १०० जणांची पहिली यादी दुपारी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कायम बैठका सुरू आहेत. त्यात भाजपाच्या जुन्या व महत्त्वाच्या उमेदवारांची नावे आहेत. तर काही तरुण कार्यकर्त्यांबद्दल प्रभागात चांगले वातावरण असल्याने अशा काही उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. तसेच महिला उमेदवारांचाही यात समावेश असून, यात नव्या आणि जुन्यांचाही मेळ भाजपने घातला असल्याची माहिती. भाजपाच्या दृष्टीने ए प्लस व बंडखोरी किंवा नाराजी उफाळून येणार नाही अशा प्रभागातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.
शिवसेनेसोबतचा तिढा सुटला का ?
पुण्यात भाजप शिवसेना युतीत शिवसेना जागा वाटप तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा शिवसेनेला दिल्या जाणार का याकडे लक्ष लागलेय. भाजपकडून अवघ्या १० ते १५ जागांचा प्रस्ताव दिला असल्याने शिवसैनिक नाराज आहेत.
शिवसेनेला पुण्यात २० ते २५ जागा हव्या आहेत. पुण्यातील काही शिवसैनिकानी पक्ष श्रेष्ठीची भेट घेतली आहे. त्यामुळे आज भाजप सेना जागावाटप तिढा कसा सुटणार हे पहावे लागणार आहे. आज सायंकाळपर्यंत भाजप शिवसेना जागाचा तिढा सुटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटप -
पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटल्याची चर्चा आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ५० -५० जागा लढणार आहेत. आज परत एकदा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे.त्यानंतर महाविकास आघाडी आज सायंकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत जागांची घोषणा करण्याची शक्यता आहे.गेले दोन दिवस पुण्यात महाविकास आघाडीचे बैठका सत्र सुरू आहे.त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जागा वाटपाबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
मनसेचं काय?
पुणे महापालिका निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी जागा वाटपाचे सूत्र अखेर जवळपास निश्चित झाले. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत अजून भुमिका नाही. आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तिन्ही प्रमुख पक्ष ५० जागा निवडणूक लढवणार आहेत. उर्वरित जागा समविचारी मित्र पक्षांना देण्यावर आघाडीचे एक मत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे-पवार एकत्र लढणार ?
पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा मावळल्या, त्याशिवाय शिवसेनेला भाजपकडून सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याचं समोर आले होते. आता यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना युतीची चाचपणी होत आहे. शनिवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन केल्याचे समोर आलेय. आज दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडणूक लढण्यास सकारात्मक आहेत. अजित पवार शिवसेनेला ४०-४५ जागा देण्यास तयार आहेत. दुसरीकडे जागा वाटपात भाजप आणि शिवसेना यांच्यात तोडगा निघत नसल्याने युती तुटणार अशी शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.