Shahapur Water Crisis: Saamtv
महाराष्ट्र

Shahapur Water Crisis: शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई! पाण्यासाठी महिलांची वणवण; रात्रभर करावा लागतोय विहिरीवर मुक्काम

Shahapur Water Crisis: राज्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापुर तालुक्यातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

Gangappa Pujari

फय्याज शेख, मुंबई, ता. १ जून २०२४

मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत असून चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करुन पाणी आणावे लागत आहे. अशी परिस्थिती सध्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.

शहापूर तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. रात्र रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. जर टँकर आले तर पाणी मिळते अन्यथा टँकर आला नाही तर तीन तीन दिवस नंबर लागत नाही. टँकर न आल्यास तीन तीन दिवस वाट पाहत विहिरीवर बसावे लागते. त्यामुळे निदान टँकरने तरी पाणी पुरवठा सुरळित करावा, अशी मागणी केली जात आहे.

आमच्या गावाची खूप बिकट परिस्थिती आहे. घरचे काम करायचे कि पाणी भरायचे. तीन दिवस पाणी मिळत नाही एक महिला ज्या घरात असते ती जर पाण्यासाठी गेली तर घरातील कामे होत नाहीत आणि घरी थांबली तर पाणी मिळत नाही, असे यावेळी स्थानिकांनी सांगितले. तसेच प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, टँकरने पाणी पुरवठा सुरळित करावा, अशी मागणीही केली.

विदर्भाचं नंदनवनअसलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहर थंड हवेचे ठिकाण आहे. परंतु सध्या या ठिकाणी पाण्याची मोठी भीषण समस्या निर्माण झाली असून चिखलदरा शहराला पाणीपुरवठा करणारे शक्कर तलाव व काला पाणी हे दोन्ही मुख्य स्रोत असलेले तलाव आहेत. हे दोन्ही तलाव सध्या पूर्णपणे आटले असून या दोन्ही तलावांमध्ये थोडही पाणी शिल्लक राहिलेल नाही. त्यामुळे सध्या चिखलदरा शहराला आमझरी इथून पाणीपुरवठा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या मागे कटकटीची पीडा; आर्थिक ताण वाढणार, जाणून घ्या शुक्रवारचा दिवस कसा असणार?

Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

SCROLL FOR NEXT