Maharashtra Cabinet Expansion: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही होणार मोठे फेरबदल, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झाली गुप्त बैठक?

Maharashtra Political News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही होणार मोठे फेरबदल, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झाली गुप्त बैठक?
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawarsaam tv
Published On

एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच 4 जून नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स पाहता काही मंत्र्यांची खाती बदलण्याची दाट शक्यता. अनेक मंत्र्यांकडे असलेल्या दोन ते तीन खाती यांच वाटप मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान होण्याची शक्यता आहे. यातच खात्यांशिवाय महामंडळात संदर्भात देखील वाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाच्या एकूणच या बदलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही होणार मोठे फेरबदल, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झाली गुप्त बैठक?
Maharashtra Politics 2024 : शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसमध्ये जाणार: लोकसभेच्या निकालाआधी सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. यावरच राज्यातील अनेक मंत्र्यांचे भवितव्यही अवलंबून आहे. कारण एकीकडे केंद्रात मोठे बदल होताना दिसणार आहे. तर राज्यातही ज्या मंत्र्यांनी लोकसभेत परफॉर्मन्स दिला आहे, ज्या पद्धतीने काम केलं आहे, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या मंत्र्यांचे खाते बदलले जाणार आहे.

तसेच काही मंत्र्यांकडे अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांकडे आधीच दोन ते तीन खाती असल्याने त्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना दिली जाऊ शकते किंवा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही होणार मोठे फेरबदल, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झाली गुप्त बैठक?
Mallikarjun Kharge: नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान होतील, मल्लिकार्जुन खरगेंचे मोठं विधान

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक गुप्त बैठक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि काही मंत्र्यांची खाते बदल करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com