Unnao Accident  saam tv
महाराष्ट्र

Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

Malshej Ghat Accident: गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. काल दुपारी माळशेज घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

पराग जगताप, ठाणे| ता. ४ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. काल दुपारी माळशेज घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माळशेज घाटामध्ये दुधाचा टँकर आणि मालवाहू टँकरमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माळशेज घाटातील आवळ्यााची वाडीजवळ दुधाचा टँकर आणि मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातात पती पत्नीसह चौघांचा मृत्यू झाला.

जुन्नर तालुक्यातील पांगरी गावचे रहिवासी असलेले पती पत्नी आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा यावेळी प्रवास करत होते. अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा वाचला. तसेच दुधाचा टँकर आणि मालवाहू ट्रकच्या टँकरचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काल अकोल्यामध्येही भीषण अपघाताची घटना घडली होती. अकोल्याचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ दोन कारची समोरा समोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT