Thane Breaking News Saam Digital
महाराष्ट्र

Thane Breaking News: ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा, १० जणांची प्रकृती चिंताजनक

Thane Breaking News: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भातसई आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून 350 विषबाधा झाली आहे. 55 विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

Thane Breaking News

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. 55 विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भातसई आश्रम शाळेतील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण दिले होतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्याने मुख्याध्यापक व अधीकक्षकांनी शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल केलं. मात्र यापैकी 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे ही घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेले विद्यार्थी नाशिकमधील रहिवासी आहेत. त्यांच्या शाळेची सहल प्रतापगड, रायगडला आली होती. सहलीला गड फिरण्यासाठी ही मुलं फार उत्सुक होती. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गड पाहिला तसेच येथील इतिहासाची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर ३० जानेवारीला रात्रीचं जेवण केलं आणि मुलं झोपली. मात्र रात्रीतूनच विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. शिक्षकांना ही माहिती समजताच त्यांनी आज सकाळी विद्यार्थ्यांना उपचाराकरता पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांनी डिसचार्ज दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील घडला होता असाच प्रकार

डिसेंबर महिन्यात देखील अशीच एक घटना समोर आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतील जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. शाळेलीत ४० विद्यार्थी आणि २ शिक्षकांना भोजनातून विषबाधा झाली होती. शालेय समितीने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने सरकारकडून शाळेची मान्यता रद्द झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT