Thackeray Group's Statewide Camp saam tv
महाराष्ट्र

Thackeray Camp News: उद्या ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा ठराव येण्याची शक्यता

Uddhav Thackeray News: या शिबीरात ठाकरे गटाचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Chandrakant Jagtap

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Thackeray Group's Statewide Camp: रविवारी मुंबईत वरळी येथील NSCI डोम येथे ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर पार पडणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होणार असून सांगता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे. या शिबीरात ठाकरे गटाचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

शिबीराच्या पहिल्या सत्रात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांची भाषणे होतील, तर दुसऱ्या सत्रात खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणं होतील. शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि या शिबीराची सांगता होईल. (Breaking News)

या शिबिराला राज्यातून संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यातील ठाकरे गटाचे राज्यप्रमुख नेते देखील या मेळाव्याला उपस्थित राहतील. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा ठराव येण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

शिवसेनेचे दोन वर्धापनदिन सोहळे

दरम्यान यंदा शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाचे दोन वर्धापन दिन सोहळे साजरे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथे होणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाचा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील ष्णमुखानंद सभागृहात पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे सर्वांना संबोधित करतील. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT