Sangli Crime News: सांगली शहर हादरले! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळया झाडून हत्या; ८ गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

Sangli Crime Attack On NCP Activist: या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaamtv
Published On

विजय पाटील, प्रतिनिधी....

Sangli Firing On NCP Supporter News: सांगली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Sangli Crime News
National Water Awards 2023: पुणे, सातारा आणि जालनातील संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर गोळीबार....

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीमध्ये राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळ शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली. राहत्या घराजवळ अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Crime News)

Sangli Crime News
Maharashtra Cabinet Expansion: उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, शाहांची घेणार भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा?

पुण्यातही गोळीबाराची घटना...

दरम्यान, आज दुपारी पुण्यातही अशीच गोळीबाराची घटना समोर आली होती.  पुण्यातील (Pune) वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ३ राऊंड फायर केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारात सुरज तात्याबा लंगार हा २१ वर्षीय तरूण जखमी झाला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com