Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'देशात अंबानी आणि अडाणी दोनच शेतकरी'; संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक टोला

Sanjay Raut News: आताचे अंबानी आणि अडाणी हे दोनच शेतकरी आहेत, असं म्हणत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारला खोचला टोला लगावला आहे.

अभिजीत सोनावणे

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आताचे अंबानी आणि अडाणी हे दोनच शेतकरी आहेत, असं म्हणत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारला खोचला टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, 'देशात आणि राज्यात शेतकरी विरोधी सरकार आहे. आम्ही त्यावर आवाज उठवतो. पंतप्रधानांना शेतकऱ्याचं उत्पन्न कधी दुप्पट होणार? असं विचारल्यास ताबडतोब प्रधानमंत्री उठतात आणि सभागृहाबाहेर निघून जातात. बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून राज्य केलं'.

'बळीराजा आणि मध्यमवर्गीय लोकांवर काय वेळ आणली तर आनंदाचा शिधा. विकास पुरुष म्हणवतात आणि जगाच्या पोशिंद्याला या शिध्यावर जगवतायेत. ही वेळ का आली, याचा विचार करायला हवा. इथला शेतकरी सन्मानानं जगतोय, याचा आनंद आहे, असे राऊत म्हणाले.

'शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी जगभरात जातात. पण हल्लीचे कृषी मंत्री कोण आहे? हे कुणी सांगू शकेल का? ५ कृषी मंत्री बदलले, मात्र कुणाला नाव तरी माहित आहे का? आताचे अंबानी आणि अडाणी हे दोनच शेतकरी आहेत, असे राऊत पुढे म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, 'दिल्लीत दोन गुजरातचे दाढीवाले आणि महाराष्ट्रात एक दाढीवाला बसवला आहे. सर्व उत्पन्न गुजरातला जात आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग येतंय, सर्व जमीन अडाणीची होणार. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे सुरू आहे . हे ईडी सरकार, खोके सरकार आहे'.

मोदी सरकरावर टीकास्त्र करताना राऊत म्हणाले, 'लोकशाहीला किंमत देत नाही, म्हणून याला हुकूमशाही म्हणतात. पण हुकूमशाही फार काळ टिकत नाही. हिटलरला देखील आत्महत्या करावी लागली. लोक एक तर हुकूमशाही नष्ट करतात किंवा त्यांना आत्महत्या करावे लागतात. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार घटनाबाह्य आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT