Ajit Pawar News: 'आमचा नावाला विरोध नाही,पण...'; अहमदनगर नामांतरावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar News: अहमदनगर नामांतरावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमचा नावाला विरोध नाही. पण, राज्यात इतरही प्रश्न आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv
Published On

Ajit Pawar News: मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यादेवीनगर' करण्याची घोषणा केली होती. तर उपमुख्यमंत्र्यांनी वेगळ्या नावाचा उच्चार केला होता. यावरून नागरिकांमध्ये संम्रभ आहे. याच अहमदनगर नामांतरावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आमचा नावाला विरोध नाही. पण, राज्यात इतरही प्रश्न आहेत, असे अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं ओबीसी चिंतन शिबीर संपन्न झालं. या शिबिराला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, हरी नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी अहमदनगर नामांतरावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला.

Ajit Pawar News
PM Modi in Odisha: दोषींना सोडणार नाही! रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

अजित पवार म्हणाले, ' नगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नाव देण्याचे मुख्यमंत्री यांची जाहीर केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे नाव बोलले. मात्र, नेमके काय नाव दिले हे सांगा. असे नाव द्या की कोर्टात त्याला स्थगिती येऊ नये. आमचा नावाला विरोध नाही. पण, राज्यात इतरही प्रश्न आहेत'.

'वाचाळवीर रोज काही ना काही बोलत आहेत. महापुरुषांचा अपमान केला जात आहे. जे राज्यपाल गेले त्यांनी अपमान केला. महाराष्ट्र सदनामध्ये जे झाले, ते योग्य होते का? असा सवाल अजित पवार यांनी शिंदे सरकारला केला.

'लोकाभिमुख काम आम्ही करतो. राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री फक्त त्या 40 आमदारांना सांभाळत आहेत, असे पवार पुढे म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता शिंदे सरकारमधील नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com