निवृत्ती बाबर
Aaditya Thackeray News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नाशिकच्या सिन्नरमधील माळेगावतील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर या कार्यक्रमातील भाषणात वरळीत काय ठाण्यात देखील राजीनामा देऊन लढेन, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देत ललकारलं. (Latest Marathi News)
आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी ज्या पद्धतीने संवाद साधतोय, तसा ते संवाद साधतील का? ५० खोके आणि एकदम ओके एवढंच सुरू आहे. एक रुपयांची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही'.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा ललकारलं. 'मी परवा म्हटलं की, राजीनामा द्या आणि वरळीत लढवून दाखवा. चला मी राजीनामा देईन. वरळीत काय ठाण्यात देखील लढेन, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खुलं आव्हान दिलं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मी समोरून आव्हान दिलं असताना सोशल मीडियावर आयटीसेलकडून टार्गेट केलं जात आहे. सगळे गद्दार माझ्या अंगावर येत आहेत. पण माझे शिवसैनिक सांभाळून घेत आहेत. माझ्या मागे कोणती महाशक्ती नाही, तर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत'.
आदित्य ठाकरे यांचा थेट गावात जाऊन नागरिकांशी संवाद
आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर असून आज नाशिक येथील गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज संध्याकाळी सात वाजता नाशिक येथे आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाला वारंवार खिंडार पडलेलं पाहायला मिळालं यानंतर जाहिर मेळाव्यात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.