Udhav Thackeray  Saamtv
महाराष्ट्र

Udhav Thackeray Speech: 'भाजपला गल्लीत कुत्रही विचारत नव्हतं...' खेडच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले; CM शिंदेंवर साधला निशाणा

Thackeray Group Rally: मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, अशी टीकाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khed: शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज कोकणात पहिलीच जाहीर सभा होत आहे. रत्नागिरी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा पार पडली. या सभेतून ठाकरेंनी भाजपा तसेच एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.

या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली. (Thackeray Group Rally)

काय म्हणाले उद्धव ठाकरे....

यावेळी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पुढे बोलताना "मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला पाठवायचे, महाराष्ट्राला कंगाल करायचं आणि फुटक्या एसटीवर जाहिराती छापायाच्या हेच काय यांचे उद्योग," असंही ते म्हणाले.

दरम्यान, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.” अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

iPhone Tips: आयफोन स्मार्टपणे वापरयचा आहे का? मग 'या' ५ गुप्त सेटिंग्ज जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

IND vs AUS : कुलदीप-हर्षितचा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूही संघाबाहेर, पाहा प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT