Uddhav Thackeray Speech: होय आम्ही शिवसेनाच... निवडणूक आयोगाचा निकाल मान्य नाही; उद्धव ठाकरे बरसले

रत्नागिरीतील चिपळूणमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
Published On

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (शिंदे गट)  (Shivsena)  आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. तुम्ही धनुष्यबाण चोरलं म्हणजे ते तुम्हाला पेलवेल असे नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रत्नागिरीतील चिपळूणमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली.

मी आज तुम्हा सर्व देवमाणसांच दर्शन घ्यायला आलो आहे. ज्यांना आजवर जे जे शक्य ते सर्व दिलं ते खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी तुम्ही आलात ही पूर्वजांची पुण्याई आहे. शिवसेना आमची आईच आहे. ज्यांना आम्ही मोठ केल त्यांनी आईवर वार केला, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.  (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray
Sushma Andhare: 'म्हणून इंजिनवाले फडणवीसांच्या मदतीला धावले...' खेडच्या सभेत सुषमा अंधारेंचा मनसेवर हल्लाबोल

शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणारे हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या एकीवर घाव घालत आहेत. एवढ्या निष्ठुरपणे, निर्घृणपणे वागत आहेत की ज्यांनी सोबत दिली त्यांना संपवत आहेत, पण करून पाहा. धनुष्यबाण तुम्ही चोरला असेल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असं नाही. जिथे रावण उताणा पडला तिथे मिंधे काय पेलणार? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
बड्डे आहे लेकाचा... मुलाच्या वाढदिवशी चक्क 'कार' कापली! वसईतील सोहळ्याची राज्यभर चर्चा

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांनी येऊन पाहावं. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे. मी 'शिवसेना'च म्हणणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल मान्य नाही, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com