रामदास कदमांच्या आरोपांवर संजय कदम यांचा पलटवार.
DHFL च्या अडचणींमुळे प्रकल्प अडकला होता.
अब्रूनुकसानीचा दावा दाखल होणार.
शिवसेना (ठाकरे गट) चे स्थानिक नेते संजय कदम यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील १५-२० वर्षांपासून आम्ही विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. २०१६ ते २०१९ दरम्यान झोपडीधारकांना भाडं दिलं होतं. त्यानंतर DHFL ने या प्रकल्पाला लोन दिलं, मात्र कंपनीच्या अडचणींमुळे प्रक्रिया अडकली. हायकोर्टाने आम्हाला थकीत भाडं देण्याचे आदेश दिले असून लवकरच ते मिळणार आहे, असे कदम म्हणाले
रामदास कदम यांच्या अनिल परब आणि संजय कदम यांनी झोपडीधारकांना फसवले या आरोपांना संजय कदम यांनी खोडून काढले. आम्ही दोन वर्षांचे भाडं दिलं आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ८ हजार झोपडीधारकांचा आकडा खोटा आहे, काही लोकांनी भाडं घेऊन स्वेच्छेने जागा सोडली आहे. लॉकडाऊन काळात आम्ही २५० जणांची राहण्याची सोय केली होती, असे त्यांनी सांगितले.
परब आपला केबलचा व्यवसाय असल्याचे सांगतात. पण त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या सांग. वडिल,भाऊ, पत्नी, मुलगी यांच्या नावे काढल्या आहेत. आम्हाला बदनाम करण्यासाठी अनिल परब हे ठाकरेंच्या सांगण्यावरुन बोलत आहेत. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मागील काही वर्षापासून माझा मुलगा योगेश कदम यांना टार्गेट केले जातंय. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून परब यांची तक्रारही केली होती. योगेश कदम मंत्री झाल्याने आता परब यांना पोटशूळ उठले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.