Bhaskar Jadhav and MLA Yogesh Kadam  Saam TV
महाराष्ट्र

Khed Panchayat Samiti Annual Meeting : एकमेकांना पाण्यात पाहणारे शिंदे-ठाकरे गटाचे २ आमदार 'व्हॅलेंटाइन डे'ला एकाच मंचावर?

Saam TV News

जितेश कोळी

Ratnagiri Political News: शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. खेड तालुका पंचायत समितीने आयोजित केलेल्या वार्षिक आमसभेच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये खेड तालुका विभागला गेला आहे. त्यामुळे खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व हे दोन आमदार करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत एकत्रित लढलेले आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम हे शिवसेना फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत.

आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात सहभागी झाले; तर आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ठाम राहिले. शिवसेना फुटीनंतर दोन्ही आमदारांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता एकमेकांवर टीका करणारे हेच दोन आमदार एकाच व्यासपीठावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Political News)

खेड तालुका पंचायत समितीची वार्षिक आमसभा 14 फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेला दोन्ही आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

तालुक्यातील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी व मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राजकीय द्वेष बाजूला ठेवून हे दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. खेड तालुक्याच्या या आमसभेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT