सुशांत सावंत
BJP Mission For BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी, आतापासूनच राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मेगाप्लान तयार केला आहे. मुंबईच्या प्रत्येक वार्डात जाऊन भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आगामी मुंबई महापालिका (BMC Elections) निवडणुकांचं रण आतापासूनच तापलं आहे. भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 'सामना' करण्यास सज्ज झाली आहे. त्याचवेळी भाजपनं या निवडणुकीसाठी मेगाप्लानही तयार केला आहे. (Political News)
भाजपच्या मुंबईतील (Mumbai) सर्व खासदार आणि आमदारांकडे 'मिशन १५०' ची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. दररोज १५०० लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पोलखोल करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील विविध विकासकामे आणि कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. आता हाच मुद्दा भाजपकडून उचलून धरला जाणार आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोलखोल करण्याचा इशारा भाजपकडून दिला जात आहे. (BJP Vs Shivsena)
कोविड काळातील भ्रष्टाचार आणि पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा कारभार भाजप चव्हाट्यावर आणणार आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून मुंबईतील राजकीय रण तापणार यात शंकाच नाही.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.