Konkan Political Saam tv
महाराष्ट्र

Konkan Politics : कोकणात ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये; बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

Konkan Political News : कोकणात ठाकरे गटात अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Saam Tv

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीमुळे कोकणातील राजकारणातही मोठे बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेना प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी संजय कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांची चर्चा झाली. त्यानंतर ठाकरे गटाने माजी आमदार संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची रंगली चर्चा होती. संजय कदम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानला जातो.

ठाकरे पक्षात राहून त्यांनी पक्षविरोधी केल्याने ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हाकालपट्टीचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या पत्रकावर शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र आहे. संजय कदम हे 2014 साली दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीतून आमदार निवडून आले. त्यानंतर या मतदारसंघातून पाच टर्म निवडून येणारे सुर्यकांत दळवी यांचा त्यांनी पराभव केला. योगेश कदम यांच्या विरोधात दोन टर्म संजय कदम यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान, माजी आमदार राजन साळवींचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना अचानक शिंदे गटाच्या प्रवेशाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर भाजप प्रवेशाऐवजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. किरण सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे साळवींनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT