BJP Leader Crime News: खोक्या भोसलेच्या अटकेची तयारी, वन विभागानं सापळा रचला; सावज कधी अडकणार?

Forest Department Action on Satish Bhosale: बाप लेकावर मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
Beed Crime Satish Bhosale
Beed Crime Satish BhosaleSaam Tv
Published On

शिरूरमधील बावी या गावात अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. महेश आणि दिलीप ढाकणे या बाप लेकावर मारहाण झाली होती. ही मारहाण भाजप पदाधिकारी सतीश भोसले आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी केली होती.

मारहाणीची घटना समोर आल्यानंतर आरोपीयांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. अशातच सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत.

ढाकणे पिता पुत्रावर मारहाण झाल्यानंतर सतीश भोसले हा नेमका कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. सतीश भोसले भाजपा पदाधिकारी असून, भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत सतीश भोसलेनं अनेक वन्य प्राण्यांचा जीव घेतलाय. ज्यात हरण, काळवीट, ससे आणि मोरांचा समावेश आहे.

सतीश भोसले हरणांची शिकार करण्यासाठी जाळी लावायचा. बावी गावातील डोंगरपट्ट्यामध्ये जवळपास अनेक मुक्या प्राण्यांचा जीव भोसलेनं घेतला आहे. ढाकणे कुटुंबाच्या शेतातही त्यानं जाळी लावली होती. त्याला हरणाची शिकार करायची होती. मात्र, ढाकणे कुटुंबानं अडवल्यामुळे बाप लेकावर भोसलेनं हल्ला केला.

Beed Crime Satish Bhosale
Santosh Deshmukh PM Report: आरोपींचे राक्षसी कृत्य, संतोष देशमुखांना अमानूष मारहाण; बरगडी,गुडघे-नडगी तोडली|VIDEO

सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मिळून शेतकरी दिलीप ढाकणे आणि मुलगा महेश ढाकणे यांच्यावर अमानूष मारहाण केली. त्यानंतर बाप लेकानं पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

Beed Crime Satish Bhosale
Badlapur: बदलापूर स्थानकात भयंकर अपघात! धावत्या लोकलमधून महिला पडली; डोक्याला गंभीर इजा

ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात येत होती, त्या स्पॉटवर स्वतः हजर राहून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. पाहणीमध्ये एका हरणाची कवटी आणि शिंगाचा भाग सापडला आहे. गुन्हा दाखल करूनही या प्रकरणी भोसलेला अटक होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com