Uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, प्रचाराची तारीखही ठरली

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाचा नाशिकमधून पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेआधीच नाशिक जिल्ह्यातील एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघातून सुधाकर बडगुजर हे लढणार असल्याची माहिती हाती आली आहे. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलाय. या मतदारसंघातून सुधाकर बडगुजर लढणार आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यात एकमताने हा ठराव मंजूर झाला आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघातून बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव पास केला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाआधी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने चांगलीच कंबर कसली आहे. ठाकरे गटाने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर झाल्यानंतर ५ ऑगस्टपासून प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षाकडून सर्व मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. तसेच त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाकडून जागावाटपाआधी उमेदवार जाहीर झाल्याने काँग्रेस आणि शरद पवार गट यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

SCROLL FOR NEXT