sushma andhare  saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare On Ajit Pawar: 'अजितदादांची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीस त्याचे रायटर', सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

Latest Political News: अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देत 'माझ्याबाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही' असे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देत 'माझ्याबाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही' असे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.

आता याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून भाजपवर (BJP) टीका होत आहे. ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'अजितदादांची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीस त्याचे रायटर होते', असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.

सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली आहे. 'अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते.', अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

तसंच, 'यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांची घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात.', अशी टीका करत महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत.', असं सुषमा अंधारे यांनी स्पष्टपण सांगितले.

सुषमा अंधारे यांनी यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेवरुन देखील सरकारवर टीका केली आहे. 'अप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा आशा सूचना केल्या असतील. पण त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे. मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून मंडप का उभे केले नाही?.' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.

तसंच, 'अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत हा कार्यक्रम घेतला गेला. शिंदे -फडणवीस यांनी खेळ केला. अमित शाह यांनीही मतांचे राजकारण केले. मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय जमत नाही.' असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

त्याचसोबत, 'पाच लाख देऊन हात झटकून चालणार नाही. उष्माघात नव्हे तर सुविधेअभावानेही लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.', अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT