Maharashtra Corona: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; घाबरू नका, पण...

Latest News: कोरोना रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर् बैठक पार पडली.
Maharashtra Corona
Maharashtra CoronaSaam Tv
Published On

Mumbai News: कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. देशासोबतच राज्यात देखील कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Varient) एन्ट्री केली आहे.

या व्हेरिएंटचा सामाना करण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यभरातील सर्व सरकारी महाविद्यालयाचे डीन आणि आयुक्तांची बैठक पार पडली.

Maharashtra Corona
Ajit Pawar Latest News : 'देवगिरी'त भेटीगाठींचा सिलसिला सुरु; भुजबळ, वळसे पाटील, तटकरेंनी घेतली अजित पवारांची भेट

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलावली होती. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि विभागाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि तो रोखण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात येतील याचा आढावा घेण्यात आला.

Maharashtra Corona
India Coronavirus Update: भय इथले संपत नाही! देशात 24 तासांत 10,542 कोरोना रुग्णांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, 'बैठकीमध्ये कोरोनाबाबत विशेष चर्चा झाली. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. राज्यात मंगळवारी 949 रुग्ण आढळले होते. मृत्यू दर फार नाही. जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने झालेत. राज्यातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा केलेला आहे. 90 टक्के लोकांनी लस घेतली म्हणून कोरोनाचा प्रभाव जाणवत नाही' तसंच, 'घाबरु नका. पण काळजी घ्या. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्या.', असे आवाहन गिरीश महाजन यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Maharashtra Corona
Sanjay Raut On Sanjay Rathod: 'माणुसकी जिवंत असेल संजय राठोडांचा राजीनामा घ्या'; संजय राऊतांचे फडणवीसांना आव्हान!

दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 949 नवीन रुग्ण आढळले. तर सहा जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये सांगितले की, नवीन कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 81,57,293 झाली आहे. तर नवीन सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील मृतांची एकूण संख्या 1,48,485 झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com