Thackeray faction Maha Adhiveshan Nashik
Thackeray faction Maha Adhiveshan Nashik Saamtv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर मैदानात या! उद्धव ठाकरेंचे नाशिकमधून ओपन चॅलेंज

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, नाशिक|ता. २३ जानेवारी २०२४

Uddhav Thackeray Nashik Adhiveshan:

शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.  

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"न्यायाविरूद्ध लढण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रात ठिणगी पेटवली त्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यांना मी अभिवादन करतो. अनेकांनी रामाचे मुखवटे घातले आहेत. पण तुम्ही माझी तुलना रामाशी केली नाही त्यासाठी धन्यवाद. जो महाराष्ट्रावर चालून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. राम एका पक्षाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अंधभक्त एकत्र...

"काल तिकडे सगळे अंधभक्त एकत्र झाले होते. कोणी तरी म्हटलं की मोदी शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही. कोणीही नाही, शिवाजी महाराज यांच्यामुळे काल तुम्ही अयोध्येत गेला. आम्ही शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत गेलो आणि वर्षभरात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला," असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

10 वर्षात काय केलं, भाजपला सवाल?

"राम की बात हो गयी अब काम की बात करो. 75 वर्षात काँग्रेसने काय केलं विचारता, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा? हिंमत असेल तर मैदानात या, शिवसैनिक हे माझी वडिलोपार्जित आहे. चोरून मिळवले नाहीत. भाजपमुळे दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली.." असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

पीएम केअर घोटाळा...

कोविड काळातील घोटाळे काढता. पीएम केअर फंडाचा घोटाळा काढा? पंतप्रधान केअर फंड खासगी फंड आहे असं सांगतात. पंतप्रधानपद गेल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहात? घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून सुरू झाली. ऍम्ब्युलन्स मध्ये 8 हजार कोटींचा घोटाळा केला. आम्हाला बोलतात काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसवाले झाले. तीस वर्षे सोबत राहून भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ, असेही ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Group News : विधानसभेत अजित पवार गट 85 जागा लढवणार?

Job Opportunities: 12 वी उत्तीर्ण जी एन एम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची मोठी संधी

Stock Market : शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Photos: लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल गेले हनिमूनला; रोमँटिक फोटो केले शेअर

SCROLL FOR NEXT