Girish Mahajan : अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप महाराष्ट्रात पुन्हा होणार; मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक विधान

Jalgaon News : महाराष्ट्रात अधूनमधून राजकीय घडामोडी घडतच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत
Girish Mahajan
Girish MahajanSaam tv
Published On

जळगाव : महाराष्ट्रात अधूनमधून राजकीय घडामोडी घडतच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Political News) प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पुन्हा एकदा केले आहे.  (Maharashtra News)

Girish Mahajan
Sambhajinagar Crime : अल्पवयीन बांग्लादेशी मुलीकडून वेश्याव्यवसाय; तिघे जण गजाआड

जळगाव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे (BJP) भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहित नाही. हा भूकंप कसा होतो माहित नाही; मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप पुन्हा महाराष्ट्रभर होणार आहेत, असे सुचक संकेत महाजन यांनी दिले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan
Cold Wave : थंडीचा जोर वाढला; धुळ्यात तापमान ७ अंशावर घसरले

पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी उल्हास पाटील निलंबित

जळगाव जिल्ह्यातील (Congress) काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे तीन दशकांपासून जिल्ह्यातील धुरा सांभाळत आहेत. सोनिया गांधींचे एकनिष्ठ शिलेदार देखील मानले जातात. मात्र डॉ. उल्हास पाटील हे त्यांची कन्या डॉ. केतकी पाटीलसह भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांची पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार उल्हास पाटील यांना सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com