Jalna Robbery News
Jalna Robbery News लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Robbery In Jalna: जालन्यात सशस्त्र दरोडेखोरांचा हैदोस; दाम्पत्याला जबर मारहाण करत लुटलं ४० तोळे सोनं

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्याच्या तीर्थपुरी गावातील रहिवासी उल्हासराव पवार यांच्या घरी पहाटे दोन वाजता सशत्र दरोडा पडला आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी पवार दाम्पत्याला मारहाण करत केली आणि त्यांच्या घरातून जवळपास ४० तोळे सोने दरोडेखोरांनी लंपास केले आहे. (Jalna Robbery News)

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तीर्थपुरी (Jalna) गावातील खिडकीचा मळा या ठिकाणी ही घटना घडली आहे. उल्हासराव पवार यांच्या घरी मध्यरात्री दोन वाजता सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकला. मध्यरात्री पवार कुटुंबिय गाढ झोपेत होते, याचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. यावेळी दरोडेखोर घराच्या कड्या आतून लावत असताना आवाज झाल्याने उल्हासराव पवार यांना जाग आली.

त्यांनी बाजूच्या घरात झोपलेले त्यांचे लहान भाऊ सुरेश पवार यांना आवाज दिला असता. तो उठून घराच्या बाहेर आला. यावेळी दरोडेखोरांनी त्याला जबर मारहाण केली आणि पवार यांच्या पत्नीलाही मारहाण करत हातातील सोन्याची बांगड्या, अंगठ्या असे जवळपास चाळीस तोळे सोने लंपास केले आहे.

जवळपास वीस मिनिटं दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत सुरेश पवार आणि त्यांची पत्नी अनुराधा सुरेश पवार यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गोदी पोलीस ठाण्याच्या पथकासह पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सोबतच फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT