Accident: खड्डा चुकविण्याच्या नादात भीषण अपघात; बहीण- भावासह 4 ठार Saam Tv
महाराष्ट्र

Accident: खड्डा चुकविण्याच्या नादात भीषण अपघात; बहीण- भावासह 4 ठार

खड्डा चुकविण्याच्या नादामध्ये अनियंत्रित कार दुभाजकारवर जोरात धडकली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काेंढाळी : राेडवर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादामध्ये अनियंत्रित कार दुभाजकारवर जोरात धडकली आणि सर्व्हिस राेडवर बसची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या ५ जणांना उडवत उलटली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ५ जणांपैकी ४ मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ- बहिणीचा समावेश आहे. ही घटना काेंढाळी ता. काटाेल या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी या ठिकाणी रविवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

बंडू ऊर्फ गौतम जागो सालवणकर (वय- ५५, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण), शाैर्य सुबोध डोंगरे (वय- ९), शिराली सुबोध डोंगरे (वय- ६) दाेघेही रा. इसापूर, ता. माैदा आणि चिन्नू विनोद सोनबरसे (वय- १३, रा. सातनवरी, ता. नागपूर ग्रामीण) अशी मृतांची नावे आहेत. या चाैघांना देखील उपचाराला नेताना वाटेमधेच मृत्यू झाला आहे. या अपघातात ललिता बाबुलाल सोनबरसे (वय- ५०, रा. सातनवरी) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

हे ५ जणांना सातनवरी येथील बसस्टाॅप जवळच बसची प्रतीक्षा करत उभे हाेते. यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादामध्ये सातनवरी येथील बसस्टाॅप जवळच्या दुभाजकावर जोरात आदळली आहे. लगेच सर्व्हिस राेडवर उलटली. तत्पूर्वी या सुसाट कारने राेडलगत उभ्या असलेल्या ५ जणांना जबर धडक दिली आहे. त्यात ५ ही जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी ५ ही जखमींना लगेच नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. मात्र, यातील चाैघांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या बहीण- भावासह अन्य एका मुलाचा समावेश आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT