पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आमक्रमक भूमिका घेतली आहे. लोकांमध्ये भारत आणि पाकिस्तानची युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. सर्वसामान्यांसहित सेलिब्रिटी देखील पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी पाकिस्तानवर भाष्य केलं. आता इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आली आहे. नकाशावरून सगळं संपवूनच टाकूया, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापुरात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वरील गीतांचा कार्यक्रम होत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये भरतनाट्यम नृत्य देखील सादर केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांनी पहलगाम आणि पाकिस्तानवर भाष्य केलं.
शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, 'आता बास झालं. पाकिस्तानला घरात घुसून मारलं पाहिजे. आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले आहेत. ज्यांच्या घरातील लोकांना मारलं आहे, त्यांनी सांगितलं की धर्म विचारला. जर कोणी विचारलं नाही, असं कोण म्हणतं असतील तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ. पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे. पाकिस्तानबरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली'.
'आता पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची वेळ आली आहे. कोण कलाकार यावर बोलत नाहीत, याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आलीये. नकाशावरून सगळं संपवून टाकुयात. माझा मोदींवर खूप विश्वास आहे, ते सर्व करून दाखवतात, जास्त बोलत नाहीत, असे ते म्हणाले.
'एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे. जे बांधव या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल, असं पाऊल उचलले जाईल. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न निर्माण केले जातात असे काही नाही. हे केवळ दाखवलं जातं. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व आहे, हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी हिंदुत्ववादी म्हणजेच पुरोगामी आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.