Police Bharti 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Police Bharti 2024: पोलीस भरतीत प्रवर्गाचा गोंधळ, EWSमधील मराठा विद्यार्थ्यांना फटका; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Maratha Reservation in Police Bharti: पोलीस भरतीत आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे पोलीस भरतीतल्या EWS प्रवर्गातील मराठा समाजातल्या उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. त्यामुळे मराठा उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय. नेमकं काय घडलंय? हे जाणून घेऊ..

Tanmay Tillu

राज्यात मेगा पोलीस भरती सुरू आहे. मात्र या भरतीत सुरू असलेल्या आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा उमेदवारांना मोठा फटका बसतोय. याच गोंधळामुळे नाशिकमध्ये पोलीस भरतीत EWS प्रवर्गात निवड झालेल्या मराठा समाजातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आलीये.

कारण या उमेदवारांची ‘SEBC’ आणि ‘खुल्या प्रवर्गात निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयानं या मराठा उमेदवारांना हमीपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र यातल्या काही विद्यार्थ्यांनी हमीपत्र देण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निवडीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रवर्ग गोंधळाचा मराठा उमेदवारांना फटका

पोलीस भरतीत मराठा उमेदवारांची EWS प्रवर्गातून निवड. शासनाच्या खुल्या आणि SEBC मधून निवडीच्या सूचना. काही मराठा उमेदवारांचा प्रवर्ग बदलण्यास आक्षेप. 6 पैकी 4 उमेदवारांचा हमीपत्र देण्यासही नकार. नाशिक पोलिस आयुक्तालयाची वरिष्ठ कार्यालयाकडे धाव. शासन निर्णय होईपर्यंत उमेदवारी स्थगित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

SCBC प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल मराठा विद्यार्थी EWS प्रवर्गातून अर्ज दाखल करत आहेत. मात्र त्यातही आता अडचणी निर्माण होतायत. त्यामुळे मेहनत करूनही अशा मराठा उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

SCROLL FOR NEXT