Tejaswi Satpute saam tv
महाराष्ट्र

४०० पोलिसांच्या बदल्या; पारदर्शक प्रक्रियेसाठी एसपी सातपुतेंचा पुढाकार

सोलापूर शहराच्या बदली प्रक्रियेनंतर ग्रामीणच्या बदली प्रक्रियेने चांगलाच वेग घेतला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : एकाच पोलीस (police) ठाण्यात पाच वर्षाची सेवा पूर्ण आणि विनंती अर्ज केलेल्या ४०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे सत्र सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये (solapur police) सुरू झाले आहे. पारदर्शक बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (tejaswi satpute) या परिश्रम घेताहेत. (tejaswi satpute latest marathi news)

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या प्रत्येक कर्मचाऱ्याचे समक्ष मत जाणून घेऊ लागल्या आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन रिक्त जागा आणि विनंती अर्जाचा विचार करून बदली प्रक्रिया राबवित आहेत. या प्रक्रियेत आस्थापना मंडळाची मोठी कसरत सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत २५ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. अडीच हजाराहून अधिक पोलिसांचे संख्याबळ असलेल्या ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहायक पोलीस फौजदार या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या सुरु आहेत. सोलापूर (solapur) शहराच्या बदली प्रक्रियेनंतर ग्रामीणच्या बदली प्रक्रियेने चांगलाच वेग घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT