सचिन बनसोडे,साम टीव्ही
अहिल्यानगर :आहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.आजीच्या घरी जात असताना गाडीत सोडतो असा बहाणा करून हे कृत्य केल्याच तपासात उघड झाले आहे.सदर आरोपीचे नाव स्वप्नील आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलीची स्वप्नीलशी ओळख ही एक महिन्यापूर्वी सोशल मीडियावर झाली होती.तेव्हापासून ते दोघे रोज एकमेकांसोबत बोलत असायचे. पीडित मुलीचे आजोळ हे सोनई गाव आहे. ती सोनईला जाणार होती, तर तिने स्वप्नीलला सांगितले, की मी उद्या सोनईला जाणार आहे. तर स्वप्नील म्हणाला मी तुला सोनाईला तुला सोडवायला येतो. आपण दोघे जाऊ असे सांगून स्वप्नीलने पीडितेला 28 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कॉल केला, आणि 4.30 वाजता एका पत्यावर येण्यास सांगितले. त्या पत्यावर पीडिता पोहोचते आणि गाडीत बसते. स्वप्नील सोबत त्याचा एक साथीदार देखील होता. गाडी स्वप्नीलचा मित्र चालवत होता.
त्यानंतर काही वेळात उंबरे ता. राहुरी येथे स्वप्नीलने त्याच्या मित्राला एका लॉजवर गाडी थांबवण्यास सांगतो. नंतर स्वप्नीलने पीडित मुलीला खाली उतरण्यास सांगितले. त्यावर तिने विचारले तू मला इथे काय घेऊन आला आहेस? तुला काही बोलायचे आहे का? त्यावर स्वप्नील म्हणाला की, तू आतमध्ये चल मी तुला सांगतो असे म्हणून स्वप्नील ने पीडितेला हात धरून आत नेले आणि पीडितेवर अत्याचार केला. पीडित मुलीने नकार दिला असता तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि अत्याचार केला. त्या नंतर तिला तिच्या आजीच्या घरी सोडले.त्यानंतर स्वप्नील हा श्रीरामपूरला निघून गेला. पण पीडित मुलगी ही सतत नाराज असायची आणि प्रचंड घाबरलेली देखील होती. नंतर ती पुन्हा श्रीरामपूरला आली असताना, काही दिवसांनी तिच्या आई वडिलांच्या देखील लक्षात आले की आपली मुलगी खूप शांत आहे.
आई वडिलांनी तिला विचारल्यावर तिने झालेली घटना सविस्तररित्या सांगितली. त्यानंतर तिच्या परिवाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली, आणि स्वप्नीलच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच स्वप्नील हा फरार झाला आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.