Teacher Recruitment Scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, भाजपच्या बड्या नेत्याला अटक Saam Tv
महाराष्ट्र

Teacher Scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, भाजपच्या बड्या नेत्याला अटक

Nagpur News: नागपूरमध्ये शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षकांना बोगस आयडी बनवून दिल्या प्रकरणी भाजप नेते दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली.

Priya More

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी ५ शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून त्यांच्या १० वर्षाच्या अरियर्सची रक्कम हडप केल्याचा आरोप या भाजप नेत्यावर आहे. दिलीप धोटे असं अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. दिलीप धोटे हे विठ्ठल-रुख्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत.

शिक्षक भरती घोटाळ्याच्या या एकट्या प्रकरणाच्या तपासात प्रत्येक शिक्षकाकडून लाखो रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आले. हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा पोलिस विभागाच्या एसआयटीच्या पथकाला संशय आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यानेच या प्रकरणातील बनावट आयडी तयार केल्याचेही तपासातून उघड झाले आहे. दिलीप धोटे हे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील भाजप नेते आहेत. त्यांच्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा आणि धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत.

पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचे बनावट आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. दिलीप धोटे यांनी काही वर्षांपूर्वी ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे शाळेत नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले होते. या घोटाळा प्रकरणातच त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर दिलीप धोटे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे सत्र नागपूर पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश जण हे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी असून काही नोकरीसाठी पैसै घेणारे दलाल आहेत. आतापर्यंत ४ शिक्षण उपसंचालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर २० ते २२ जणांना टप्प्या टप्याने अटक करण्यात आली. सध्या शिक्षण संस्थाचालक हे पोलिस विभागचा रडारवर आहेत. या प्रकरणात गोंदियातील संस्था चालकाला अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandi Pedha Recipe : साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा घरी कसा बनवावा? वाचा सीक्रेट रेसिपी

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT