Nagpur Fire : नागपूरमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, दोन जणांचा होरपळून मृत्यू, दोन जखमी

Deadly Midnight Blaze in Nagpur: नागपूरच्या महाल भागातील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागून दोन जणांचा मृत्यू, दोन जखमी. ज्वलनशील वस्तूंमुळे आग भडकली, मोठं आर्थिक नुकसान झालं.

Massive fire breaks out in Nagpur’s Rajkamal Complex at midnight : नागपूरच्या राजकमल कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहेत. नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गिरीष खत्री आणि विठ्ठल धोंडे यांचा मृत्यू झाला, तर गुणवंत नागपूरकर आणि ऐश्वर्या त्रिवेदी गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे परिसरात दहशत पसरली असून, फॅन्सी फटाके, सिरीज हॅलोजन लाइट्स आणि इलेक्ट्रिक साहित्याचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.

आग लागण्याचे कारण अस्पष्ट असले तरी, कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. महाल परिसरातील गजबजलेल्या बाजारामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला असून, तपास सुरू आहे.

Deadly Midnight Blaze in Nagpur
Encounter : मोठी बातमी! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com