बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी
Teacher Burnt Alive in Dharashiv : शिर्डीवरून दर्शन घेऊन घरी परत जाताना काळाने घाला घातला. कारला अचानक आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघे जण सुखरूप बचावले आहेत. उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ ही घटना घडली. उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. एक जण मयत झाला, तर दोघेजण वाचल्यामुळे घातापाताचा पोलिसांना संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेतून वाचलेल्या दोन्ही व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय बळावला आहे.
कारला आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला तर गाडीतील इतर दोघेजण सुखरूप वाचले. शिर्डी येथे साई बाबाचे दर्शन करून हैदराबादला परत जात असताना घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मयत व्यक्ती हैदराबाद येथील शिक्षक असल्याचं समोर आले आहे.
दाबका गावाजवळ घडलेल्या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याशिवाय दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवदर्शनावरून घराकडे परत जात असताना कारने अचानक पेट घेतला, गाडीतील तिघांपैकी एका व्यक्तीला बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्याचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य दोघ वेळीच बाहेर पडल्याने वाचले, असे सांगण्यात येत आहे. पण पोलिसांना घातपाताचा संशय आहे.
आम्ही या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी करत असल्याचे पोलिसांनी सांगितलेय. कार दुर्घटनेतून वाचलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दोघांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उमरगा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दुर्घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या आगीचे नेमके कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.