tanaji sawant , malshiras , hospital  saam tv
महाराष्ट्र

जनतेची कामं करा अन्यथा ऑपरेशन करू; आरोग्य मंत्र्यांचा अधिका-यांना इशारा

मंत्री सावंत यांनी तेथून सहाय्यक संचालकांना स्वच्छ्ता कर्मचारी घेण्याचे आदेश दिले.

भारत नागणे

Health Minister Tanaji Sawant News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज माळशिरस तालुक्यातील माळशिरस (malshiras) नातेपुते येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. या पाहाणी दरम्यान त्यांना येथील आरोग्य केंद्रात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यामुळं मंत्री सावंत यांनी अधिका-यांना फैलावर घेतलं. यावेळी अधिकारी वर्गासह रुग्णालय व्यवस्थापनाची भांबेरी उडाली. मंत्री सावंत यांनी तत्काळ त्रुटी दूर करा असं सांगितलं आहे.

राज्यात सत्तांतर होवून दोन महिने झाले परंतु अजूनही अधिका-यांना सत्तांतर झाले आहे असं वाटत नाही. त्यांची मानसिकता बदलायलाच तयार नाही. ग्रेस पिरियड संपला आहे. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही मंत्री सावंत यांनी‌ यावेळी कामचूकारांना दिला.

प्रारंभी मंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णालयातील स्वच्छता गृहाची पाहणी केली. यावेळी त्यांना ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छतागृहात याेग्य पद्धतीने स्वच्छता केलेली गेली नाही असं आढळलं. त्यामुळे मंत्री सावंत भडकले. त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना याबातचे विचारणा केली. स्वच्छता कर्मचारी काेठे आहे असेही विचारलं. त्यानंतर मंत्री सावंत यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला रोजंदारीवर सफाई कामगार घेण्याचे अधिकार दिले. त्याबाबत मंत्री सावंत यांनी तेथून सहाय्यक संचालकांना स्वच्छ्ता कर्मचारी घेण्याचे आदेश दिले.

Edited By : Siddhath Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: कोणतीही चाहूल न देता येणारा आजार! BPची लपलेली लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा...

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले

Rakesh Bedi: अभिनेत्याने ५१ वर्ष लहान धुरंधर एक्ट्रेस साराला केलं Kiss, नेटकऱ्यांना पटलं नाही, पाहा नेमकं झालं काय?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

Coal India Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT