Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : विजेचा शॉक लागून 2 तमाशा कलावंतांचा मृत्यू, बुलडाण्यातील यात्रेदरम्यानच्या घटनेने हळहळ

Tamasha Kalakar Dies due to electric Shock : मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात ही घटना घडली आहे. तमाशाचा फड उभारताना हा अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldhana News :

बुलडाण्यात विजेचा शॉक लागून दोन तमाशा कलावंतांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी गावात ही घटना घडली आहे. तमाशाचा फड उभारताना हा अपघात झाला.

पान्हेरी खेडी गावात कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. दोन दिवसांच्या असणाऱ्या या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी तमाशाचे फड उभारणे सुरू असतानाच मोठी दुर्घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कलावंत तमाशाचा फड उभा करत असताना हातातील लोखंडी पायपाचा विद्युत तारेला संपर्क झाला. यामध्ये शॉक लागून कलावंत अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

मृतक अंकुश भारुडे हे मूळचे नारायणगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी होते. तर विशाल भोसले हे राजुर गणपती येथे राहतात. दोघेही आनंद लोकनाट्य मंडळाचे कलावंत तथा कर्मचारी होते. या घटनेनंतर यात्रेच्या उत्साहाच्या वातावरणादरम्यान गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT