taloda citizen injured after cow hits him saam tv
महाराष्ट्र

Taloda News : गाईच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, तळोदा पालिका माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करणार का ?

या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करु लागले आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

तळोदा शहरातील गणपती गल्लीत गाईने हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मोकाट जनावरांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या अकार्यक्षमतेवर नागरिक नाराजी व्यक्त करु लागले आहेत. (Maharashtra News)

तळाेदा शहरातील गणपती गल्लीतील रहिवासी दिगंबर गुलाबराव सोनार (वय 66) हे आपल्या घरातून जवळील दुकानावर निघाले हाेते. त्यावेळी रस्त्यात उभे असलेल्या मोकाट गायींपैकी एका गाईने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व शिंगावर उचलून घेत त्यांना फेकून दिले.

त्यामुळे दिगंबर सोनार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताच्या खांदा जायबंदी झाला व डाेक्याला गंभीर इजा झाली. तळोदा शहरातील मोकाट गुरांमुळे एखाद्याच्या जीव गेल्यावर पालिका जागी होईल का ? असा प्रश्न घटनेनंतर उपस्थित हाेऊ लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. शेवटी पालिका प्रशासन मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करेल की नाही असा प्रश्न नागरिक करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT