तळीयेतील जलनीमाता डोंगराला भेग ! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

तळीयेतील जलनीमाता डोंगराला भेग !

प्रशासनाकडून डोंगराचे सर्वेक्षण सुरू. तळीयेमध्ये10 हेक्टरमध्ये वसणार नवे गाव...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावातील जलनी माता डोंगर कोसळून कोंडाळकर वाडीतील 32 कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत 84 ग्रामस्थांचा दरडीखाली दडपून मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

तळीयेमध्ये कोसळलेल्या जलनी माता डोंगराला दोन फुटाची भेग पडली असल्याने त्यातून पाण्याचा लोट वाढून ही दुर्घटना झाली आहे. याबाबत भुवैज्ञानिक हे स्थानिकांच्या मदतीने सर्वेक्षण करत आहेत. त्याचबरोबर तळीये ग्रामपंचायत हद्दीतील कोंडळाकर वाडी, म्हस्के वाडी, यादव वाडी, सुतारकोंड अशा सात वाड्यांचे पुनर्वसन हे 10 हेक्टर जागेत तळीये मध्येच केले जाणार आहे.

यासंदर्भात तळीये गावचे उपसरपंच महेश म्हस्के यांनी माहिती दिली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही पावले उचलली जात आहेत. त्यामुळे तळीये गावातच संपूर्ण गाव पुन्हा एकदा उभारले जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT