Talegaon Nagar Parishad Saam tv
महाराष्ट्र

Talegaon Nagar Parishad : कर वसुलीत ४२ मालमत्तांना लावले सील; तळेगाव नगरपरिषदेची धडक कारवाई

Talegaon Dabhade News :तळेगाव- दाभाडे नगर परिषदेची यावर्षी थकीत मालमत्ता १०० टक्के वसुली करण्याचा निर्धार केला होता. याबाबत मालमत्ता धारकांना नोव्हेंबर २०२४ मध्येच नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.

दिलीप कांबळे

मावळ : महापालिका, नगरपालिकेकडून मार्च महिन्यात कर वसुली मोहीम राबविण्यात आली होती. काही ठिकाणी अजून देखील वसुली सुरु असून या अंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने तीव्र मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये कराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. अशा एकूण ४२ मालमत्तांना सील लावण्याची कारवाई नागरपरिषदेकडून करण्यात आली. 

तळेगाव- दाभाडे नगर परिषदेची यावर्षी थकीत मालमत्ता १०० टक्के वसुली करण्याचा निर्धार केला होता. याबाबत मालमत्ता धारकांना नोव्हेंबर २०२४ मध्येच नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. या कारवाईत मोबाईल टावर, नॅशनल हायवे कंपनी यांची मिळकत कर थकबाकी असल्याने आणि शासकीय थकबाकी अशी एकूण पंधरा कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. न्यायालयात प्रकरण असल्यामुळे शंभर टक्के वसुली होऊ शकली नाही.

१५ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली 

दरम्यान प्रशासनाने राबविण्यात आलेल्या मोहिमेत मार्च अखेर २१ कोटी ९० लाख रुपये वसूल केले आहेत. तर पंधरा कोटी ८८ लाख रुपयांची वसुली न्यायालयाच्या फेऱ्यात अडकली आहे. या दरम्यान नोटीस दिल्यानंतर देखील थकीत कर भरणा करण्यात आला नाही. अशा कर चुकवणाऱ्यांच्या बेचाळीस मालमत्तांना नगरपरिषदेकडून सील ठोकण्यात आले आहे. 

तर त्या मालमत्तांचा लिलाव 

मिळकत सील करण्यात आलेल्या मालमत्ता धारकांनी पूर्ण कर न भरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. येत्या काळातही ही वसुली मोहीम सुरूच राहणार असल्याचे  तळेगाव दाभाडे नगरपरिषडेच्या  कर संकलन विभाग प्रमुख कल्याणी लाडे यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT