House in Ambajogai where Talathi Ganesh Koli allegedly died by suicide just 12 days after his marriage. Saam tv
महाराष्ट्र

पत्नीचे अनैतिक संबंध, सतत मानसिक त्रास; वैतागलेल्या तलाठ्यानं लग्नाच्या १२ दिवसांतच मृत्युला कवटाळलं

Talathi End Life Within 12 Days Of Marriage Ambajogai Case Details: अंबाजोगाई येथे लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत तलाठी गणेश कोळी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून आईच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. आता या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीत लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली. मात्र, पत्नीचे वागणे बदलले. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.

गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला.गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १२३६० रुपयांनी झालं स्वस्त; आजचे 18k- 22k आणि 22k चे दर किती?

Maharashtra News Live Update: सिंदखेडराजात भरदिवसा गौरक्षकाला मारहाण...

Chanakya Niti : पाण्यासारखा पैसा कमवायचा असेल तर ५ गोष्टी कराच! नशीबही फळफळतील

LPG Rule Change: LPG च्या नियमात मोठा बदल, ३० दिवसांच्या आत सिलिंडर परत करावा लागणार नाही तर...

देशात आणखी एक बुलेट ट्रेन धावणार, तब्बल 1500 किमी प्रवास फक्त 6 तासांत

SCROLL FOR NEXT