Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी नदीत गेला, परतलाच नाही; तलाठ्यासोबत घडली भयानक घटना

Parbhani News: परभणीत अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेला तलाठी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

राजेश काटकर

Parbhani News: परभणीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. परभणीत अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेला तलाठी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथे घटना घडली आहे. या घटनेतील मृत तलाठ्याचा मृतदेहाचा नदीपात्रात शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

अवैध वाळू माफीयांवर कारवाईसाठी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ हे पूर्णा नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. सकाळपासून पूर्णा नदीपात्रात तलाठ्याचा शोध घेतला जात आहे.

तलाठी होळ हे आपले सहकारी तलाठ्यासोबत नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्र लावून वाळू उपसा होत असल्याचे दिसले.

नदीच्या पलीकडे असलेल्या यंत्रसामुग्रीवर कारवाईसाठी तलाठी सुभाष होळ हे नदीपात्रात उतरले. पोहोत जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच दम छाटल्याने तलाठी होळ नदीपात्रात बेपत्ता झाल्याची माहिती सोबत असलेले तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली आहे. सायंकाळी सहावाजेपर्यंत शोध लागला नसल्याने सर्वाना त्यांची चिंता लागली आहे.

कुटुंब चिंतेत

अवैध वाळू माफीयांवर कारवाईसाठी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ नदीपात्राजवळ गेले होते. यावेळी त्यांना नदीच्या पलीकडे वाळू माफीयांची यंत्रसामुग्री दिसली. यामुळे होळ हे कारवाईसाठी नदीच्या पलीकडे चालले होते.

तलाठी सुभाष होळ हे पोहत जात नसताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे होळ हे पाण्यात बुडाले. ही माहिती कर्मचाऱ्यांना कळताच वरिष्ठांना कळवली. सध्या नदीपात्रात त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. तलाठी होळ हे नदीपात्रात बुडाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा-बाय बाय? 'या' स्पर्धकाच्या नावाची जोरदार चर्चा

Punjab : व्हायरल मेसेजनंतर विद्यार्थी आक्रमक, युनिव्हर्सिटीत गदारोळ; जाळपोळ करत राष्ट्रीय महामार्ग रोखला, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात संशयित केमिकल गळती; दोन तरुणांचा मृत्यू

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यापूर्वी खात्यात येणार ₹2,000? मोठी अपडेट समोर

Latest Mangalsutra Designs: 6-7 ग्रॅममध्ये बनवा सुंदर सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स करवा चौथसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT