Pune Crime News: पुणे हादरले! तरुणाला दगडाने ठेचून संपवले, 2 आठवड्यांपूर्वीचं ते धक्कादायक कारण झालं उघड

Pune Youth Killed Case: दारु पिऊन शिविगाळ केल्यामुळे पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हत्या, चोरी आणि अपघात यासारख्या घटना तर वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये पुण्यामध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Pune Young Man Killed Case) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.

Pune Crime News
HSC RESULT 2023 : बारावीचा निकाल ९१.२५ टक्के, कोकण, पुण्याची पोरं हुशार; वाचा निकालाची वैशिष्ट्ये

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. दोन आठवड्यापूर्वी श्रीकांत मच्छिंद्र जाधव याने एका व्यक्तीला दारु पिऊन शिविगाळ केला होता. याचाच राग मनामध्ये धरुन या व्यक्तीने श्रीकांतचा काटा काढला. या व्यक्तीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने श्रीकांतची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन काही दिवसांपूर्वी त्याने आरोपी सुनील पारेकरच्या घरासमोर शिवीगाळ केली होती. त्यामुळे सुनील पारेकरने श्रीकांतला दारू पिऊन याठिकाणी शिवीगाळ करू नको असे सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री श्रीकांतने दारू पिऊन पुन्हा सुनीलशी वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनीलने आपल्या दोन मित्रांना बोलावून श्रीकांचा काटा काढण्याचे ठरवले.

Pune Crime News
Nashik Bus Driver End Life: नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये बिघाड, चालकाने टोकाचं पाऊल उचलत संपवलं जीवन

या घटनेनंतर सुनील आणि त्याच्या दोन मित्रांनी श्रीकांत जाधवला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुनील पारेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com