Amit Shah Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

Amit Shah on Maharashtra Assembly Election: महायुतीत काही आलबेल नाही. तिन्ही पक्षात धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमिवर मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल. भांडण मिटवा, अशा कानपिचक्या अमित शहांनी दिल्यात.

Girish Nikam

लोकसभेत महायुतीची पिछेहाट झाल्यानं आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांड अलर्ट झालं आहे. भाजपचे चाणक्य अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. महायुतीत सारं काही आलबेल नाही. अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यातही शिंदे गटाचे मंत्री आणि काही भाजप नेते उघडपणे अजितदादांच्या पक्षावर आणि त्यांच्या अर्थखात्यावर निशाणा साधत आहेत. या पार्श्वभूमिवर अमित शाहांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्यात.

भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल. मित्र पक्षांविरुद्ध काही करणं म्हणजे उद्धवसेना, शरद पवार गटाला मदत केल्यासारखे होईल., अशा शब्दात अमित शहा यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करताना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यायत. अशी माहिती सूत्रांनी दिलीये. तर पुढील 8 दिवसांत पक्षातील लहान-मोठी भांडणं मिटवा. उमेदवारीसाठी भांडणं करणाऱ्यांचा विचार होणार नाही, जे शांतपणे पक्षाचं काम करतील त्यांचाच विचार होईल, अशी तंबीदेखील अमित शहा यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा महत्वाचा ठरला होता. त्यामुळे अमित शहांनी विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढा, असंही म्हटलंय. अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षण हटविण्याची केलेली भाषा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं शहांनी म्हटलंय.

विरोधकांची मुळंच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचं भाजपचे निवडणूक संयोजक रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.

भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलं आहे. लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यानं आता भाजप ताकही फुंकून पित आहे. महायुतीतील मोठा भाऊ भाजपला मित्र पक्षांची कशी साथ मिळते ते पाहणं तितकच महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

SCROLL FOR NEXT