Tadoba saam tv
महाराष्ट्र

Tadoba Online Booking : ताडोबा ऑनलाईन बुकिंगचा मार्ग माेकळा, उद्यापासून करा नाेंदणी; जाणून घ्या नवी वेबसाईट

Update on Online Tadoba Safari Booking : देशासह विदेशातील पर्यटकांना ताडाेबाचे आकर्षण असल्याने असंख्य पर्यटक ताडाेबाला येतात.

संजय तुमराम

Tadoba-Andhari National Park Online Booking : चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी नोंदणी करण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. उद्यापासून (ता. 23 सप्टेंबर) ताडोबाची नवीन बुकिंगचे संकेतस्थळ (website) अंमलात येणार आहे. याबाबतची माहिती डॉ. जितेंद्र रामगावकर (क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

या प्रकल्पाच्या या आधीच्या खाजगी एजन्सीने मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर गुन्हे दाखल होत कारवाई झाल्याने ऑनलाइन नोंदणी ठप्प झाली होती. याचा फटका ताडोबातील अर्थकारणाला बसला होता.

दरवर्षी 1 ऑक्टोबरपासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्राचे पर्यटन नियमितपणे सुरू करण्यात येते. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी नुकतीच ही घोषणा केली. नवी बुकिंग वेबसाईट महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड आणि एनआयसी या संस्थांनी तयार केली आहे.

राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य व निसर्ग पर्यटनस्थळे (tourism) यांचा एकत्रित नोंदणी प्लॅटफॉर्म 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या केवळ नेटबँकिंग अथवा इंटरनेट बँकिंगद्वारेच यासाठीची रक्कम अदा करता येईल. काही दिवसातच सर्व प्रकारच्या पेमेंट सुविधा देण्यात येणार आहेत.

वन्यजीव व व्याघ्रप्रेमींनी www.mytadoba.mahaforest.gov.in या वेबसाईटवर बुकिंग करण्याचे आवाहन डॉ. जितेंद्र रामगावकर (क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नाशिक मतमोजणी केंद्रावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT