Jagadguru Shankaracharya Meet Uddhav Thackera 
महाराष्ट्र

Jagadguru Shankaracharya: उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात झालाय: जगद्गुरु शंकराचार्य

Jagadguru Shankaracharya Meet Uddhav Thackeray: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर यांनी मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वामींच्या पादुकांचे पूजन केले.

Bharat Jadhav

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात झालाय, असं म्हणत जगद्गुरु शंकराचार्य यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावलेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर यांनी मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शं‍कराचार्यांचे स्वागत केले.

स्वामींच्या पादुकांचे पूजनानंतर शं‍कराचार्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपाला चांगलेच सुनावले आहे. विशेष म्हणजे अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दिले होतं. आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी भाजपवर घणाघात केलाय.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत धोका करून त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासात झालाय. जनता उद्धव ठाकरे यांच्यामागे आहे. आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचा पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे.

सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे. याबाबतची पीडा अनेकांना असल्याचं शं‍कराचार्य म्हणालेत. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपला हिंदुत्वावादींवर सुनावलंय. कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीच असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिलेत आशीर्वाद

मोदी माझ्यासमोर आले त्यांनी मला प्रणाम केला आणि आमचा नियम आहे जो कोणी प्रणाम करायला येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो, असंही स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT