Raju Shetti, ED  saam tv
महाराष्ट्र

Swabhimani लढविणार लाेकसभेच्या सहा जागा; 'या' मतदारसंघातून Raju Shetti लढणार

भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी भापजला लगावला.

विजय पाटील

Raju Shetti News : सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केले. दरम्यान राज्यभरात स्वाभिमानी सहा ठिकाणी लोकसभेची निवडणुक लढवेल. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नाही असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.  (Maharashtra News)

सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. ED चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका असा टोला त्यांनी भाजप सरकाराला लगावला. यामध्ये माझा सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी भापजला लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासमवेत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते आणि राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते आर्थिक संकटात असताना राज्यकर्त्यांकडून कोणतीही मदत किंवा विचारपूस शेतकऱ्यांची केली जात नाही. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

१५ तरुणींवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ काढून द्यायचा धमक्या, नराधमाच्या कृत्याने कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT